देवगड (प्रतिनिधी): शिक्षणामुळे अनेक क्षेत्रामधून विदयार्थ्यांनी आपली प्रगती केली आहे. यामुळे ज्या शाळेमध्ये आपण शिक्षण घेतले ती शाळा म्हणजे मंदिर आहे. यामुळे प्रत्येक विदयार्थ्याने शाळेसाठी आपापल्या पध्दतीने योगदान दिले पाहिजे. व स्नेहमेळावे घेवून शैक्षणिक काळातील जुन्या आठवणींना उजाळा दिला पाहिजे. असे मत वाडा हायस्कुलचे मुख्याध्यापक नारायण माने यांनी व्यक्त केले.अ.कृ.केळकर वाडा हायस्कुलमध्ये 1991 सालच्या दहावीच्या माजी विदयार्थ्यांनी स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपिठावर लोकल कौन्सीलचे शांताराम पुजारी, देवगड एज्युकेशन बोर्डचे सदानंद पवार, माजी मुख्याध्यापक मनोहर भगत, टि.बी.पाटील,अनुराधा दिक्षित, नाईकवडी,डि.व्ही.जोशी, हिरनाईक सर,खरात सर, संजीवनी फडके, उल्का जोशी,सातवळेकर सर आदी उपस्थित होते. तर माजी विदयार्थी राजा परब,योगेश गुरव,देवगड तालुका पत्रकार समिती अध्यक्ष व माजी विदयार्थी अयोध्याप्रसाद गावकर,श्रीनिवास मराठे, सचिन देसाई,कुंदा पडेलकर,जय कोयंडे,शरद आचरेकर,सुजाता जाधव,सुरबी पुरळकर,प्रशांत मेस्त्री,संदिप वाडेकर,दिपक तारी,जय कोयंडे व 1991 सालचे दहावीचे माजी विदयार्थी व विदयार्थींनी उपस्थित होते. वाडा हायस्कुलच्या सभागृहामध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.लेझिम पथक व ढोल ताशाने शाळेमध्ये शिक्षकांसहित माजी विदयार्थ्यांनी प्रवेश केला. 1991 सालच्या मित्र मैत्रिणींचे निधन पावलेल्या विदयार्थ्यांना भावपुर्ण श्रध्दांजली यावेळी वाहण्यात आली. तसेच दहावीमधील मार्च 2023 गुणवंत विदयार्थ्यांना भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला. तसेच सध्या शाळेमधील विविध क्रिडा क्षेत्रामध्ये प्रविण्य मिळविलेल्या विदयार्थ्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच या 1991 सालच्या दहावीच्या वाडा हायस्कुलच्या माजी विदयार्थ्यांनी एका शिक्षक वर्गखोलीची रंगरंगोटी करण्यात आली. 32 वर्षानंतर वाडा हायस्कुलचे माजी विदयार्थी भेटल्यानंतर शैक्षणिक आठवणी ताज्या झाल्या होत्या.