एसटी महामंडळाच्या 51 व्या आंतरविभागीय नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी 20 डिसेंबर पासून वेंगुर्लेत

एसटी उपमहाव्यवस्थापक श्रीनिवास जोशी यांच्या अध्यक्षतेखाली प्राचार्य डॉ चौगले यांच्या हस्ते होणार उदघाटन

कणकवली (प्रतिनिधी) : एसटी महामंडळाच्या 51 व्या आंतरविभागीय नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरीचे उदघाटन 20 डिसेंबर पासून मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय नाट्यगृह कॅम्प वेंगुर्ले येथे एसटी महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक श्रीनिवास जोशी यांच्या अध्यक्षतेखाली प्राचार्य डॉ चौगले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी वेंगुर्ले नगरपरिषद चे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छीन्द्र सुकटे उपस्थित राहणार आहेत. 20 डिसेंबर ते 23 डिसेंबर दरम्यान दररोज सायंकाळी 7 वाजता एक नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. 20 डिसेंबर रोजी कोल्हापूर विभाग नाटक, 21 डिसेंबर रोजी सांगली विभाग बॅलन्स शीट, 22 डिसेंबर रोजी सातारा विभाग आई बाबा आणि ती , 23 डिसेंबर रोजी रत्नागिरी विभाग किनारा हे नाट्य सादर करणार आहे. सर्व नाट्यप्रयोग ही विनामूल्य असून रसिक प्रेक्षकांनी आवर्जून उपस्थित राहून नाट्यस्वाद घ्यावा असे आवाहन सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक अभिजित पाटील यांनी केले आहे.

error: Content is protected !!