बाबा भालचंद्र महाराज… प्रमोद जठार महायुतीचे खासदार होऊ दे

भाजपा कार्यकर्त्यांनी भालचंद्र महाराजांच्या चरणी घातले साकडे

भालचंद्र महाराज मठात प्रमोद जठार यांनी सहकुटुंब घेतले दर्शन

कणकवली (प्रतिनिधी) : बाबा भालचंद्र महाराज, येत्या लोकसभा निवडणुकीत महायुती चे उमेदवार म्हणून प्रमोद जठार यांना उमेदवारी मिळू देत आणि जठार बहुमतांनी खासदार होऊ देत असे साकडे भाजपा कार्यकर्त्यांनी भालचंद्र महाराज चरणी घातले. प.पू. भालचंद्र महाराज संस्थान येथे भालचंद्र महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा होत आहे. प्रमोद जठार यांनी पत्नी नीरजा, बंधू सुरेश व त्यांची पत्नी यांच्यासह सहकुटुंब आज सायंकाळी प.पू. भालचंद्र महाराज मठात जात भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी दर्शन घेतले. त्यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे प्रमोद जठार खासदार व्हावे म्हणून साकडे घातले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, विजय चिंदरकर, बबलू सावंत, भुपेश चव्हाण, प्रसाद देसाई, पपू पुजारे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!