मसुरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती हायस्कूल आणि कै.विणा सुरेश बांदेकर ज्युनिअर कॉलेज ऑफ व्होकेशनल कोर्सेस येथे वार्षिक क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ श्री भगवती एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापक आबा पुजारे यांच्या हस्ते झाला.कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रीडा ज्योत प्रज्वलित करून सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ देण्यात आली.तसेच हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती एम. बी.कुंज,क्रीडा शिक्षक एन जी वीरकर,सहाय्यक शिक्षक प्रसाद बागवे,हरीश महाले,गौरी तवटे, प्रणय महाजन, गुरुप्रसाद मांजरेकर,स्वप्निल कांदळगावकर,मीताली हिर्लेकर,प्रियांका कासले, सुरेश नार्वेकर,मनोहर कडू आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.