सरकारी वकील गजानन तोडकरी, नितीन कुंटे यांचा यशस्वी युक्तिवाद
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील एका महीलेचा गुन्हयातील आरोपी सूर्यकांत चव्हाण मीटर रीडींग घेण्याचा बहाणा करत विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला एक वर्षाचा कारावासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. सरकारतर्फे सरकारी वकील नितीन कुंटे व तात्कालीन सरकारी अभियोक्ता गजानन तोडकरी यांनी काम पाहिले.
कणकवली पोलिस ठाण्यातील भादवी कलम ४५१, ३५४, ३२३ अन्वये गुन्हयातील आरोपी सूर्यकांत चव्हाण वय ३५ रा. ओरोस याला महीलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कणकवली न्यायालयाचे न्यायाधीश शेख यानी दोषी धरून आरोपीस क. ४५१ साठी एक वर्ष ३५४ साठी एक वर्ष ३२३ साठी ६ महीने सश्रम कारावास व एकूण रु ५००० दंड अशी शिक्षा सुनावली. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शितल पाटील व पोलीस नितीन बनसोडे यांनी केला आहे.