मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण जिल्हा परिषद मतदार संघातील खारेपाटण पंचायत समितीचे अपक्ष उमेदवार रफिक उस्मान नाईक यांनी आज बुधवार दि.४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता आपल्या सहकारी कार्यकर्त्यां समावेत खारेपाटण बाजारपेठेत. प्रचार फेरी काढली.तर प्रचारा दरम्यान शिवसेना उबाठा पक्षाच्या अप्रत्यक्ष सहभागाने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे.
खारेपाटण पंचायत समिती मतदार संघात यंदा तिरंगी लढत होत असून महायुतीचे गुरुप्रसाद शिंदे व शिवसेना उबाठा पक्षाचे रामचंद्र राऊत तर अपक्ष उमेदवार रफिक नाईक हे निवडणूक रिंगणार उभे असून या मतदार संघात शिवसेना उभाठा पक्षाचा अधिकृत उमदेवार उभा असताना देखील या मतदार संघातील अपक्ष उमेदवार रफिक नाईक शिवसेना उभाठा पक्षाकडून अंतर्गत मोठा सपोट मिळत असल्याची चर्चा सध्या खारेपाटण मध्ये सुरू आहे.यामुळे रफिक नाईक हे या निवडणुकीत विजयचा बार उडवतील.का ? असा सवाल आता स्थानिक मतदार करू लागले आहेत.
दरम्यान खारेपाटण बाजारपेठ येथे काढण्यात आलेल्या प्रचार फेरीत स्थानिक व्यापारी मतदार व नागरिक यांना भावनिक साद घालत अडीअडचणीला धावून येणाऱ्या व संकटकाळी मदत करणारा व नेहमीच आपल्या संपर्कात राहणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन केले.












