संत गाडगेबाबा पुण्यतिथी निमित्ताने प्रदीप नारकर यांचे आवाहन
देवगड (प्रतिनिधी) : देवगड साईनाथ वाडी येथे परीट सेवा संघ देवगड यांच्या वतीने ६७ वी संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरी करण्यात आली.यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार विजेते प्रदीप नारकर हे प्रमुख पाहुणे होते त्यांचा मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला. यावेळी परीट सेवा संघाचे देवगड तालुका अध्यक्ष विजय पाटील ,उपाध्यक्ष मोहीते, माजी उपनगराध्यक्ष नगरपंचायत देवगड राजेंद्र वालकर, दळवी गुरुजी, शाहाकार लाड, गणेश कुणकेश्वरकर ,पप्पू हडकर, वालकर ,हडकर मॅडम, वालकर मॅडम सर्व परीट जाती बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी आरती भजन त्यानंतर प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते दिपप्र ज्वलन फोटो च्या प्रतिमेला हार व झाड्ची पुजा करण्यात आली तद्नंतर मृत व्यक्तींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली वर्षभर झालेल्या कामाचे अहवाल वाचन दळवी गुरुजी यांनी केले त्यानंतर विविध परीक्षामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांना शिष्यवृत्ती देण्यात आली.यावेळी मान्यवराच्या भाषणामधे उपाध्यक्ष मोहीते यांनी देणगी जास्तीत जास्त देण्याबाबत आवाहन केले जेणेकरून यापुढे शिष्यवृत्ती जास्त स्वरूपात देता येईल ,श्रीमती हडकर यांनी आपण दरवर्षी पिग्मी स्वरूपात योगदान मंडळास देतो तस प्रत्येकाने काही ना काही स्वरूपात पिग्मी गोळा करून मंडळास सहकार्य करावे असे आवाहन केले . वालकर यांनी शैक्षणिक धोरण काय असावे मुलांनी स्पर्धेच्या युगात टिकून रहायचे असेल तर काय करावे लागेल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले कु वालकर यांनी उच्च शिक्षण आणि शैक्षणिक क्षेत्रात इंग्रजी भाषेचे ज्ञान किती आवश्यक आहे हे सागीतले. शाहाकार यांनी या मंडळाने केलेले कार्य सुंदर असून भविष्यात याहून प्रगती होण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून काम समाजासाठी केले पाहिजे याकरिता विविध उपक्रम राबवून समाज समृद्ध होईल याकडे लक्ष द्यावे.
या कार्यक्रमाच्या निमिताने प्रमुख पाहुणे प्रदीप नारकर बोलताना म्हणाले की, संत गाडगेबाबा यांनी केलेले कार्य हे पुढे नेण्यासाठी आणि समाज शैक्षणिक व्यावसायीक दृष्टीकोनातून प्रगत समाजाने एकत्र येऊन काम केले पाहिजे हे डिजिटल युग असून मुलांना अधिकारी व उद्योजक बनविण्यासाठी त्यांना चांगल्या मार्गदर्शन याची गरज आहे आपण यासाठी सदैव कटिबद्ध आहोत असे सांगीतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आभार प्रदर्शन शाहाकार यांनी मांडले विलास साळस्कर यांच्या हस्ते यांनी संपूर्ण कार्यक्रमाचा महाप्रसाद देण्यात आला.












