मालवण (प्रतिनिधी): मालवण तालुक्यातील पळसंब गावचे मुख्य मानकरी श्री अण्णा कापडी व परिवाराने श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन चॅरिटेबल ट्रस्टला २ लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश दिला. नुकत्याच झालेल्या सभेमध्येअण्णा कापडी यांनी त्यांच्या २७ वर्षांचा लेखाजोखा मांडताना त्यांची २७ वर्षांत साठवलेली पूंजी देवस्थान चॅरिटेबल ट्रस्टच्या समाज हीतकारी कामांसाठी अर्पण केली. मुख्य मानकरी अण्णा कापडी हे श्री जयंतीदेवीचे निःसिम भक्त आहेत व गावांतील सुधारणा, प्रगती यासाठी कापडी कुटुंब नेहमीच मनोभावे कार्यरत असते. या देणगी बद्दल पळसंब ग्रामस्थ व श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन चॅरिटेबल ट्रस्टने श्री अण्णा कापडी व त्यांच्या परिवाराचे आभार मानले आहेत.
मुख्य मानकरीअण्णा कापडी व परिवाराकडून श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन चॅरिटेबल ट्रस्ट पळसंबला २ लाखांची देणगी
