कणकवली (प्रतिनिधी): नुकताच सातारा येथे झालेल्या क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य, कोल्हापूर विभागीय युवक महोत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलाकारांनी बाजी मारली आहे. यामध्ये लोकगीत (समूह)या स्पर्धेमध्ये कणकवलीतील रंगखांब ग्रुप यांची लातूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय युवक महोत्सवामध्ये निवड झालेली आहे. यामध्ये कणकवलीतील गौरी चाळके, श्वेता घाडीगावकर, ऐश्वर्या घाडीगावकर,पुनम गुजर, सलोनी मेस्त्री, गितेश कोयंडे, सोहम राणे, रोशन तांबे,सुजित तांबे, चिन्मय सावंत यांनी सहभाग घेतलेला होता. तसेच लोकगीत (वैयक्तिक) या स्पर्धेमध्ये विनायक शीलवंत याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या संपूर्ण लोकगीतांचे संगीत संयोजन व मार्गदर्शन श्री.श्रीधर पाचंगे यांनी केले आहे. लोकनृत्य स्पर्धेमध्ये एस.पी.के.महाविद्यालय सावंतवाडी यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. पाककलामध्ये समिधा राऊत यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.ऍग्रो प्रोडक्ट मध्ये मिताली देसाई यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.ही संपूर्ण स्पर्धा दिनांक 29 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत लातूर क्रीडा संकुल या ठिकाणी संपन्न होणार आहे तरी सर्व स्पर्धक कलाकारांच्या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी सौ.विद्या सिरस मॅडम यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.
