खरारे पेंडूर ग्रामपंचायत उपसरपंच पदी सुमित सावंत यांची बिनविरोध निवड

चौके (अमोल गोसावी) : ग्रामपंचायत खरारे-पेंडूर रिक्त उपासरपंच पदासाठी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सदस्य सुमित अरुण सावंत यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे सुमित सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गावाच्या विकासासाठी दिलेल्या संधीचे नक्कीच सोने केले जाईल. असे नवनियुक्त उपसरपंच सुमित सावंत यांनी यावेळी सांगितले. केंद्रीय मंत्री नारायण राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी यांच्या सहकार्यातून गावातील विकासकामांसाठी आवश्यक निधी मिळवण्यासाठी प्रयत्नाशील असल्याचे सुमित सावंत यांनी सांगितले.

यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, सरपंच नेहा परब, शक्ती केंद्र प्रमुख आतिक शेख, शेखर फोंडेकर, राजन माणगावकर, विनायक पटेल, आप्पा सावंत पटेल, दिपा सावंत, संजय नाईक, सतिश पाटील, साबाजी सावंत, अमित कुलकर्णी, रामू सावंत, तिरवडे उपसरपंच सुशील गावडे, उमेश गावडे, मकरंद सावंत, बाबा पराडकर, शामकांत आवलेगावकर, नंदू परब, अमित सावंत, श्रावणी नाईक, अरुणा सावंत, गजानन सावंत, विवेक जबडे, शैलेश परब, सुनीता मोरजकर, अश्विनी पेडणेकर, अंकिता सावंत, स्वरूप वाळके, गजानन पेंडूरकर, न्हानु पेंडूरकर, लक्ष्मण घोगळे, बाळू देऊलकर, रमेश म्हापणकर तसेच इतर ग्रामस्थ पदाधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!