जयेंद्र रावराणे दै.नवराष्ट्र आणि नवभारत पुरस्कृत आदर्श शिक्षण संस्था पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

वैभववाडी (प्रतिनिधी) : नवराष्ट्र दैनिकाच्या दुसऱ्या वर्धापनदिना निमित्त आयोजित नवराष्ट्र आणि नवभारत पुरस्कृत सन्मान सोहळा २०२३ रत्नागिरी येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक २४ डिसेंबर रोजी संपन्न झाला. शिक्षण क्षेत्रात वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष पदावर कार्य करत असताना शिक्षणक्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष तथा जि.प.सिंधुदुर्ग चे मा.वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे यांना आदर्श शिक्षण संस्था या पुरस्काराने रत्नागिरी चे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक श्री धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती कुमार पुजार, माजी आमदार बाळासाहेब माने, नवरात्र दैनिकाचे संपादक उपस्थित होते. सिंधुदुर्ग पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तोरस्कर उपस्थित होते.

error: Content is protected !!