आपला सिंधुदुर्ग न्यूज इम्पॅक्ट

कणकवलीत ऑनलाईन जुगार एजंटांची पोलीस ठाण्यात आणली वरात

ऑनलाईन जुगारवाल्यांचे धाबे दणाणले

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज ने ऑनलाईन जुगाराविरोधात सातत्याने लावलेल्या बातमीचा इफेक्ट पडला असून कणकवलीत ऑनलाईन जुगार एजंटांची वरातच पोलीस ठाण्यात आणण्यात आली. दस्तुरखुद्द पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी 6 ऑनलाईन जुगार एजंटना पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी करत त्यांचे मोबाईल जप्त केले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याचे समजते. जुगार एजंटां च्या घरी जात पोलीस हवालदार सुपल, नाईक रुपेश गुरव, कॉन्स्टेबल किरण मेथे, राज आघाव यांनी जुगार खेळण्यासाठी वापरत असलेले मोबाईल ताब्यात घेत त्यांना पोलीस ठाण्यात आणले.दरम्यान ऑनलाईन जुगार एजंटांचे धाबे दणाणले असून कणकवली पोलिसांनी ठोस पावले उचलल्याबद्दल पालकांतून समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!