तळेरे प्रभाग स्तरीय क्रीडा स्पर्धाना शिडवणे येथे प्रारंभ

“महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो….” – रवींद्र उर्फ बाळा जठार

खारेपाटण (प्रतिनिधी) : “जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभागाच्या वतीने प्राथमिक शालेय स्तरावरील विद्यार्थ्यासाठी दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या बाल क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना खऱ्या अर्थाने वाव मिळत असतो.” असे भावपूर्ण उदगार जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व वित्त सभापती रवींद्र उर्फ बाळा जठार यांनी कणकवली तालुक्यातील जि.प.शाळा शिडवणे नं.१ येथे आयोजित करण्यात आलेल्या तळेरे प्रभाग स्तरीय बाल क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सवाच्या उद्घघाटन प्रसंगी बोलताना काढले.

या कार्यक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी प्रेरणा मांजरेकर,सेवानिवृत्त माजी शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पाताडे, शिडवणे गावचे सरपंचरवींद्र शेट्ये,उपसरपंच दीपक पाटणकर, वारगाव उपसरपंच नाना शेट्ये, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटणकर, राष्ट्रपती पोलीस पदक विजेते निवृत्त पोलीस अधिकारी विजय टक्के, शिडवणे ग्रा.पं.सदस्य सुप्रिया पांचाळ,स्मिता टक्के,कोमल शेट्ये,तंटामुक्ती समिती अध्यक्ष महेंद्र टक्के,शा.व्य.स.मि अध्यक्ष महेंद्र धुमाळ, शिडवणे शाळेचे मुख्याद्यापक प्रवीण कुबल, शेर्पे शा.व्य.स.सदस्य विलास पांचाळ, नडगिवे शाळा नं.१ शा.व्य. स.अध्यक्ष सतीश कर्ले,कुरगवणे खैराट शा. व्य. स.सदस्य बाबू गोठनकर क्रेंद्रप्रमुख गोपाळ जाधव, संजय पवार,खारेपाटण जि.प.केंद्र शाळा नं.१ चे उच्च श्रेणी मुख्याद्यापक प्रदीप श्रावणकर सर आदी मान्यवर तसेच तळेरे प्रभागातील सर्व शाळांचे शिक्षक ग्रामस्थ पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या क्रीडा महोत्सवाचे उद्घघाटन माजी जि.प.बांधकाम व वित्त सभापती श्री रवींद्र उर्फ बाळा जठार यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे शिडवणे जि.प.शाळा नं.१ च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तळेरे प्रभागातील एकूण ४ केंद्रातील सुमारे १५० पेक्षा अधिक विद्यार्थी या क्रीडा महोत्सवात सहभागी झाले होते. या सर्व विद्यार्थी व शिक्षकांना क्रीडा शपथ सामूहिक रित्या देण्यात आली.तर या क्रीडा महोत्सवात मैदानी १२ खेळप्रकार यांसह ज्ञानी मी होणार, समूह गीत व समूह गायन या स्पर्धांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

अधिक जलद,अधिक उंच, अधिक बलवान व अधिक बुद्धिमान या बाल कला क्रीडा ज्ञानी मी होणार महोत्सवाच्या क्रीडा ज्योतीचा शुभारंभ शिडवणे गावचे सरपंच रवींद्र शेट्ये यांच्या शुभहस्ते करून मैदानी खेळाना सुरवात करण्यात आली.यावेळी सुहास पाताडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत तळेरे प्रभागाचे नांव यंदा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा मध्ये येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा असे आवाहन करत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. या संपूर्ण स्पर्धांचे क्रीडाप्रमुख म्हणून सत्यवान केसरकर व विनायक जाधव हे काम पाहत आहेत. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक तळेरे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी प्रेरणा मांजरेकर यांनी केले.तर या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभुते सर व आभार अमोल तूपविहिरे सर यांनी मानले.

error: Content is protected !!