नववर्षाच्या स्वागतासाठी देवगड मध्ये “जल्लोष”कार्यक्रमाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन
देवगड (प्रतिनिधी) : नववर्षाच्या स्वागतासाठी व ज्यामुळे देवगडची ओळख आहे असा जल्लोष या कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या उपस्थित करण्यात आला.यावेळी बोलताना नितेश राणे म्हणाले देवगड चे नाव उज्वल करण्यासाठी देवगड वासियांची साथ महत्वाची आहे.देवगडच्या पर्यटनासाठी आपण अनेक प्रकल्प निर्माण केले देवगडमध्ये निर्माण झालेले गार्डन हे आदर्श गार्डन आहे हे पाहण्यासाठी अनेक पर्यटक येतात असे अनेक प्रकल्प आपण उभे करू शकतो मात्र मी करत असलेल्या प्रकल्पांना आपणही साथ दिली पाहिजे.पर्यटनातून रोजगार निर्माण होण्यासाठी देवगड तालुका हा चांगला तालुका आहे. देवगड मध्ये रोजगारासाठी पर्यटन हा मार्ग स्वीकारण्यासाठी सर्वांनीच पुढे आले पाहिजे
या शुभारंभाच्या वेळी जल्लोष अध्यक्ष हनीफ मेमन संजय धुरी शामराव पाटील व अन्य अनेक उपस्थित होते.
यावेळी 30 डिसेंबर रोजी शालेय चित्रकला स्पर्धानचे आयोजन करण्यात आले होते.तसेच खवय्यासाठी फूड्स्टॉल उभारण्यात आले होते,लहान मुलासाठी अनेक खेळ .तसेच सायंकाळी 7.00 वा.मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्य स्टेजचे अनावरण करण्यात आले. व गणेश वंदना यावेळी करण्यात आली.. व रात्री आमदार नितेश राणे यांचे हस्ते जल्लोष कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.तसेच यानंतर या ठिकाणी स्थानिक मुलांनी आपला कलाविष्कार कार्यक्रम सादर केला.व रात्रौ 9.00 वाजता ऑर्केस्ट्रा बेधुंद सादर करण्यात आला.यामध्ये गायिका कविता राम, नचिकेत देसाई आदी कलाकारांनी आपली कला सादर केली. या वेळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाचा रसिकांनी लाभ घेतला.











