मालवण (प्रतिनिधी) : अवघ्या महाराष्ट्रात दिंडे जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हातील मालवण तालुक्यातील चिंदर गावच्या आई भगवती माऊलीचा जत्रोत्सव मार्गशिर्ष पौर्णिमेपासून म्हणजे 25 डिसेंबर पासुन विविध उत्सवांंनी साजरा होत काल पाचव्या दिवशी 30 डिसेंबर रोजी लळीत उत्सवाने समाप्तीची समाप्ती झाली. पाच दिवस विधिवत पूजा माहेरवासिनिचचे नवस फेडणे. भजन किर्तन, पुराण वाचन, आरती असा नित्यक्रम चालु होता. काल रात्री भजन, पुराण, दशावतारी नाट्यप्रयोग, किर्तन, गोधंळ, आरती अशी जत्रोत्सवाची सांगता झाली.












