देवगड (प्रतिनिधी) : देवगड मधील सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व असलेले आणि सुप्रसिद्ध निवेदक व व्यापारी संजय भालचंद्र धुरी यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी सोमवारी सायंकाळी ४ सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.त्यांच्या निधनाने देवगड मधील सांस्कृतिक विश्वाला हा एक मोठा धक्का बसला.
धुरी हे उत्कृष्ट निवेदक, देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्थेचे सचिव, देवगड रोटरी क्लबचे संस्थापक सेक्रेटरी, देवगड लायब्ररी तसेच अनेक संस्थांवर पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. धुरी यांच्या निधनाने देवगड मधील सांस्कृतिक कार्यक्रमात आयोजना मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्या पाश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे.