कणकवली (प्रतिनिधी):कणकवली तालुक्यातील शिरवल गावचे ग्रामदैवत श्री लिंग रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव शिरवल रवळनाथ मंदिर येथे बुधवारी 3 जानेवारी रोजी भक्तीमय वातावरणात साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी विधिवत पूजा, त्यानंतर रात्री ११ वाजेपर्यंत श्रींचे दर्शन , तसेच नवस बोलणे,नवस फेडणे,ओटी भरणे आदी कार्यक्रम होणार आहेत.रात्री रवळनाथ मंदिरातून पालखी लिंग मंदिरात मानकरी आणि दशावतारी कलाकारांसह नेली जाते .आणि मानवली जाते.पून्हा पालखी रवळनाथ मंदिरात आणली जाते.त्यानंतर मंदिराच्या सभोवती पालखी प्रदक्षिणा घालून मंदिरात आणली जाते.रात्री 12 वाजता चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग सादर होणार आहे. मानकरी मंडळींच्या ओट्या भरल्यानंतर माहेरवाशिणींच्या ओट्या भरण्याचा कार्यक्रम होणार आहे.या जत्रोत्सव कार्यक्रमाला भाविकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.असे आवाहन शिरवल वासियांनी केले आहे.