रिक्षाचालकाला आली चक्कर…दुचाकींसह दुकानाला दिली टक्कर

सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी सारस्वत बँक नजीक आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बाजारपेठेतून कॉलेजमार्गे माजगाव येथे जाणाऱ्या रिक्षाचालकाला अचानक चक्कर आल्याने रिक्षा थेट उजव्या बाजूला वळून रस्त्यालगत असलेल्या दुकानासह तेथे पार्क केलेल्या ४ दुचाकींना धडकली. सुदैवाने त्या ठिकाणी कोणीही उभे नसल्याने मोठा अनर्थ टळला. रिक्षा चालकाला तेथील नागरिकांनी उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले. अपघातात ३ दुचाकींसह दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले.

error: Content is protected !!