पोखरण शाळेचा ६ रोजी शतक महोत्सव सोहळा !

कुडाळ (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पोखरण नंबर १, तालुका कुडाळ या प्रशालेचा शतक महोत्सव समारोह सोहळा ६ जानेवारी रोजी सकाळी १० वा होणार आहे. यावेळी शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार वैभव नाईक, मुख्य कार्य अधिकारी प्रजीत नायर, योगेश ससाणे, मनोज गुळेकर, सरपंच समीक्षा जाधव आदी प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सकाळी १० वा माजी विद्यार्थी माजी सैनिक, माजी विद्यार्थी सन्मान सोहळा,संध्याकाळी ७ वा. विध्यार्थी पारितोषिक वितरण, रात्री ८.३० ते १० विध्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम, रात्री १० वा. पोखरणच्या सुकन्या प्रस्तुत दशावतार कृष्णपूजन, ७ जानेवारी रोजी साय ६ ते ८ ही आवडते मज मनापासून शाळा, रात्री ८ ते ९ शतक महोत्सव सांगता सोहळा माजी खासदार डॉ निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. उपस्थितीचे आवाहन शतक महोत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष शामसुंदर सावंत, उपाध्यक्ष विठोबा सावंत, खजिनदार संजय कदम यांनी केले आहे. सदर माहिती अजित धोडु सावंत आणी रमाकांत धोंडु सावंत यांनी दिली आहे.

error: Content is protected !!