ग्रामसेवक प्रशांत जाधव यांच्या सीईओ नायर यांनी केला सत्कार
वैभववाडी (प्रतिनिधी) : धनगर समाजातील बांधवांचे जीवन कसे आहे, त्यांच्या संस्कृती, पारंपरिक नृत्य याची प्रचिती जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी वैभववाडी तालुक्यातील सडूरे- अरुळे गावात घेतली. वैभववाडी पं स चे गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसेवक प्रशांत जाधव यांनी स्थानिक ग्रामस्थ आणि धनगर समाजातील बांधवांच्या सहकार्याने सुनियोजित कार्यक्रम आखला आणि पारंपरिक धनगरी गजा नृत्य,धनगरी घुगुरं काठी, घोंगडी, तांदूळ साठवणुकीतील बिवळे या सर्व गोष्टीचा समावेश करून मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांचे गावात जंगी स्वागत करण्यात आले. छ. शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पुण्यशोलक अहिल्या होळकर यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरवात करणेत आली.पारपरिक गोफ भजन, स्थानिक फुगडी, आणि धनगरी गजा नृत्य कार्यक्रमाने रंगत आली. धनगर समाजाची कौशल्यपूर्ण लोककला पाहून थक्क झालेल्या सीईओ नायर यांनीही समाधान व्यक्त करत गैरवोद्गार काढले. सडूरे ग्रामस्थ आणि खासकरून या गावचे ग्रामसेवक श्री. प्रशांत चंद्रकांत जाधव यांनी केलेल्या उत्तम नियोजनमुळे हा कार्यक्रम करणे शक्य झाल्या चे गटविकास अधिकारी परब यांनी विशेष नमूद केले. याबद्दल मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामसेवक यांचा शाल.,श्रीफळ देऊन सम्मान केला. यावेळी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाची टीम यांचबरोबर पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.