तोंडवळी- तळाशील येथील मच्छी विक्रेत्या महिलांना आचरा येथे मच्छी मार्केटमध्ये – मच्छी विक्रीस परवानगी मिळावी..!

तोंडवळी गावातील महिलांनी आचरा सरपंच व आचरा पोलिसांचे लेखी निवेदनाद्वारे वेधले लक्ष

आचरा (प्रतिनिधी) : गेल्या कित्येक वर्षापासून मालवण तालुक्यातील तोंडवळी गावातील तळाशील येथील मच्छी विक्रेत्या महिला आचरा येथे गुरुवार, रविवारी आठवडा बाजाराच्या दिवशी व इतर दिवशी मच्छी विक्रीचा व्यवसाय करत आहेत. परंतु अलीकडे आचरे गावातील काही मच्छी विक्रेत्या महिलांनी तोंडवळी- तळाशील मधील मच्छी विक्रेत्या महिलांना आचरा येथील मच्छी मार्केटमध्ये बसून मच्छी विक्री करण्यास विरोध करीत आहेत. दिनांक 14/1/2024 रोजी तळाशील मधील काही मच्छी विक्रेत्या महिला मच्छी विक्री करण्यासाठी आचरा येथे गेले असता त्यांना विरोध दर्शऊन यापुढे मच्छी विक्री करण्यास येथे आलात तर तुमच्या मच्छी वर फिनेल ओतून उसकावून लावण्यात येईल अशी धमकी देण्यात आली. सदर धमकीची बाब गंभीर असून तोंडवळी- तळाशील  येथील मच्छी विक्रेत्यां आचरा मच्छी मार्केटमध्ये बसण्यास परवानगी देऊन न्याय मिळवून द्यावा अशी मागणी आचरा गावचे सरपंच जेरॉन फर्नांडीस व आचरा पोलिसांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

तसेच तोंडवळी- तळाशील येथील महिलां मच्छी विक्रेत्यांना आचरा मच्छी मार्केटमध्ये मच्छी विक्रीस परवानगी न देण्यामागील कारण लेखी स्वरूपात मिळावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देताना मच्छी विक्रेत्या महिला पूजा शेलटकर, गया तारी, स्वप्नाली केळुसकर, दीपिका केळुसकर,सलोनी खवणेकर, अर्चना चोडणेकर, तारामतीस मायबा, नीता कोचरेकर, नली रेवंडकर,संजना रेवंडकर,तसेच आचराचे माजी सरपंच मंगेश टेमकर ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर आदी उपस्थित होत्या.

error: Content is protected !!