कुडाळ (प्रतिनिधी) : अयोध्या येथे होणाऱ्या राम मूर्ती प्रतिष्ठापणा सोहळ्यानिमित्त पावशी येथे श्री देवी सातेरी मंदिर मध्ये सोमवारी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी 9 वाजता श्री शांतादुर्गा मंगल कार्यालय पावशी ते श्री देवी सातेरी मंदिर पर्यंत श्री राम प्रभूंची मूर्ती वाजत गाजत मिरवणुकीस आगमन होणार आहे . (प्रत्येकाने पारंपारिक वेशभूषा करून कार्यक्रमास उपस्थित रहावे. ) सकाळी 10.30 वाजता पूजा – आर्चा , 11 ते 1.30 वाजता भाविकांसाठी दर्शन , 1.30 ते 2.30 महाप्रसाद , संध्याकाळी 3 ते 6 नामस्मरण / हळदीकुंकू समारंभ, 6 वाजता दीपोत्सव व महाआरती आहे , तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन पावशी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.











