तरंदळे येथे शिवजयंतीनिमित्त भाजपा पुरस्कृत शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : तरंदळे ग्रामपंचायत यांच्या वतीने आज 17 फेब्रुवारी रोजी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत छत्रपती शिवाजी महाराज जयंतनिमित्त पहिली ते सातवी पर्यंत निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं आहे. स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिक वितरण रविवारी 19 तारीखला होणार आहे. तसेच पहिली ते सातवी लहान गट, मोठा गट वेशभूषा स्पर्धा रविवारी शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात आली आहे. सकाळी 11 वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. ह्यावेळी सरपंच सुशिल कदम, उपसरपंच शुभावली सावंत, माजी सरपंच सुधीर सावंत, माजी उपसरपंच संदेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य नेहा घाडीगावकर, संजना राणे, दीपक घाडीगावकर तसेच शिक्षक श्री.पोकळे, श्री.डोईफोडे, श्री.तळगावकर, श्री.तांबे, तांबे मॅडम, तळदेवकर मॅडम आणि गावातील पालक तसेच रहिवासी उपस्थित होते.

error: Content is protected !!