श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याने चिंदर झाले भक्तिमय

चिंदर वासियांच्या एकतेचे घडले दर्शन

चिंदर (प्रतिनिधी) : आजचा दिवस हिंदूधर्मियांसाठी अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस. अयोध्या नगरीसह देशभरात श्री राम मंदिर आणि प्रभू श्री राम प्राण प्रतिष्ठापणा यामुळे उत्साहाचे वातावरण असताना. प्रत्येक गावा गावात उत्सव साजरा होतोय. चिंदर गावात आज श्री रामेश्वर मंदिर येथे सकाळी श्री देव रामेश्वर अभिषेक, श्री राम महापूजा, होम हवन असा चालू होता. दुपारी 12 वाजता राम मंदिर उदघाटन व प्रभू श्री राम प्राण प्रतिष्ठापणा सोहळा थेट श्री रामेश्वर मंदिर परिसरात पाहताना मात्र रामभक्तांनमध्ये उत्साह पहायला मिळाला. तसेच याची देही याची डोळा पाहताना अनेक जन भावुक झाले. आरती झाल्या नंतर महाप्रसाद झाला. हळदीकुंकू समारंभालाही महिलांन मध्ये उत्साह पाहायला मिळाला. गावातील विविध मंडळानचीं भजने असा कार्यक्रम चालूं होता. यावेळी चिंदर गावात उत्साहाचे, भक्तिमय वातावरण व चिंदर गावच्या एकात्मतेचे दर्शन पहायला मिळाले.

error: Content is protected !!