सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग कणकवली येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे निवासी श्रमसंस्कार शिबिर यशस्वीरित्या संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग कणकवली येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन मातोश्री वृद्धाश्रम सांगवे-भिरवंडे येथे आयोजित करण्यात आले होते.यावर्षी च्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या निवासी श्रमसंस्कार शिबिराची थीम युवकांचा ध्यास-ग्रामशहर विकास अशी ठेवण्यात आली होती.या मध्ये जलसंधारण ,कन्या बचाव ,कृत्रिम संगणकीय बुद्धिमत्ता ,विज्ञानिक दृष्टिकोन,आरोग्य विषयी जनजागृती,इत्यादी बाबी समाविष्ट केलेल्या आहेत.या कार्यक्रमात सांगवे गावचे सरपंच श्री.संजय सावंत तसेच उपसरपंच श्री. प्रफुल्ल काणेकर यांना बोलावण्यात आले होते. त्यांचे स्वागत राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी प्रतिनिधी मंदार कुलकर्णी, इंद्रागोपल बिल्ले, सिद्धी सुतार, आणि वैष्णवी उगवेकर यांनी केले.

सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग कणकवली येथे दिनांक 14 जानेवारी 2024 ते 20 जानेवारी 2024 या दरम्यान राष्ट्रीय सेवा योजना विभागा तर्फे निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन सांगवे (मातोश्री वृद्धाश्रम) येथे करण्यात आले होते. सांगवे गावचे सरपंच संजय सावंत, उपसरपंच प्रफुल्ल काणेकर, प्रा. अरविंद वि. कुडतरकर सर,प्रा. डॉ. एस . टी . माने मॅडम, आणि वैभव यादव सर यांच्या उपस्थितीत उदघाटनांचा कार्यक्रम पार पडला.राष्ट्रीय सेवा योजनेच्या समाजोपयोगी बंधारे बांधणी उपक्रमाला व इतर विविध उपक्रमांना सहकार्य करू असे आश्वासन सरपंच आणि उपसरपंच यांनी दिले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या या निवासी श्रमसंस्कार शिबिराला त्यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले व खूप शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश साटम सर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे संयोजन केले.याकरिता संस्थेचे संस्थापक मा. नारायणराव राणेसाहेब ,केंद्रीय मंत्री( सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्री भारत सरकार) ,अध्यक्षा सौ .निलमताई राणे मॅडम उपाध्यक्ष मा.खा. निलेशजी राणेसाहेब , सेक्रेटरी मा. आ. नितेशजी राणेसाहेब, तसेच महाविद्यालयाचे प्रशासकिय अधिकरी श्री. शांतेश रावराणे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा.अरविंद कुडतरकर सर, डॉ.एस . टी . माने मॅडम आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी स्वयंसेवक मंदार कुलकर्णी व इंद्रगोपाल बिल्ले, मुज्जुमिल शेख यांनी केले. या शिबिरामध्ये विविध विषयांवरती चर्चा झाली. त्यामध्ये दर दिवशी वेगवेगळ्या विषयांवर बौद्धिक चर्चासत्रे रंगली.

डॉ. विनय शिरोडकर यांनी वाढते प्रदूषण आणि आरोग्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. वसीम सय्यद सर यांनी राष्ट्रीय सेवा योजने मधील कर्तव्य दक्षता, तर अभिनेते निलेश पवार यांनी कलेतील जीवन, ॲड. राधिका मुंज-मिशाळ मॅडम यांनी आपले कर्तव्यअधिकार, श्रावणी मदभावे मॅडम यांनी आजचा युवक आणि व्यसनाधीनता तसेच आयुर्वेदाचार्य वैद्य डॉ.सुविनय दामले सर यांनी नैसर्गिक जीवन निसर्ग आणि समतोल या विषयावर चर्चा केली. तसेच या शिबिरादरम्यान स्वच्छता मोहीम रामेश्वर मंदिर भिरवंडे, मोहनराव मुरारी सावंत आरोग्य केंद्र कनेडी , समाज मंदिर सांगावे, रामेश्वर मंदिर कनेडी, दिर्बादेवी मंदीर येथे राबवली गेली होती व नदी मध्ये बंधारा बांधला आहे.अश्यारितीने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागा तर्फे निवासी श्रमसंस्कार शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले.

error: Content is protected !!