शेर्पे स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील शेर्पे या गावातील मुख्य रस्ता ते स्मशान भूमिकडे जाणारा रस्ता (उर्वरित) खडीकरण व डांबरीकरण करणे ह्या कामाचा शुभारंभ दी.२४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता जिल्हा परिषद सिंधुदुर्ग बांधकाम व वित्त माजी सभापती रविंद्र उर्फ बाळा जठार व खारेपाटण विभाग भाजप शक्ती केंद्र प्रमुख सूर्यकांत भालेकर,यांच्या शुभहस्ते नुकतेच संपन्न झाले.

या कार्यक्रमाला शेर्पे सरपंच स्मिता पांचाळ,उपसरपंच सिराज मुजावर,कुरगवणे सरपंच संतोष ब्रम्हदंडे,शेर्पे बूथ अध्यक्ष शाबान मुजावर,माजी सरपंच निशा गुरव,माजी उपसरपंच रामा पांचाळ,पोलीस पाटील विनोद शेलार,तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रकांत कांबळे,ग्रा.पं.सदस्य भूषण शेलार,शीतल कांबळे,राजश्री बेळणेकर,सायली पांचाळ,ग्रामसेवक मोहन माने,ग्रामस्थ – सुभाष शेलार,मधुकर शेलार,सुरेश ब्रम्हदंडे दत्ताराम सावंत, विजय कांबळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सत्यविजय शेलारआदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!