डी.के.फाऊंडेशन सिंधुदुर्ग आयोजित गुरुकुल शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

डी.के.फाऊंडेशनचे सर्वच उपक्रम विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक; माजी राज्यमंत्री भरमु अण्णा पाटील

कणकवली (प्रतिनिधी) : डी.के.फाउंडेशन सिंधुदुर्ग आयोजित गुरुकुल शिष्यवृत्ती गुणगौरव सोहळा नुकताच नगर वाचनालय हॉल, कणकवली येथे संपन्न झाला.या कार्यक्रमाला माजी राज्यमंत्री भरमू अण्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली . सोबत कृषी फलोत्पादन अध्यक्ष उदय कुमार देशपांडे , सुभाष भोसले व अनेक शाळांचे मुख्याध्यापक ,शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ या तालुक्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

डी.के.फाउंडेशन करीत असलेले शैक्षणिक व सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे, फाउंडेशनचे स्पर्धा परीक्षा अंतर्गत राबविण्यात येणारे सर्वच उपक्रम विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरतील, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री भरमु अण्णा पाटील यांनी याप्रसंगी केले. तसेच एस एम हायस्कूलचे मुख्याध्यापक बोडके सर व कणकवली विद्यामंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक कांबळे सर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

गुरुकुल शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल पुढीलप्रमाणे:-

इयत्ता पाचवी मराठी माध्यम-
प्रथम क्र. विभागून कु.आरोही मनोज मेस्त्री व अर्णव संतोष पाटील (विद्यामंदिर हायस्कूल कणकवली)
द्वितीय क्र. सोहम कारंडे (एस एम हायस्कूल)
तृतीय क्र. श्रीराज प्रसन्न सावंत (एस एम हायस्कूल)

इयत्ता पाचवी इंग्रजी माध्यम:
प्रथम क्र .चिन्मय उदय राणे द्वितीय क्र. स्वराली राजेश कदम तृतीय क्र. रुद्र भक्तप्रल्हाद बांदिवडेकर ( सर्व विद्यार्थी आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे)

इयत्ता आठवी-मराठी माध्यम:
प्रथम क्र. विभागून – योगा विजय मयेकर व आर्या लक्ष्मण आगलावे (कुडाळ हायस्कूल)
द्वितीय क्र. वेदिका पंढरीनाथ करवडकर (आचरा हायस्कूल)
तृतीय क्र. विभागून- तनिष्का महेंद्र वारंग व सई अंकुशराव घुटुकडे (आचरा हायस्कूल)

इयत्ता आठवी -इंग्रजी माध्यम:-
प्रथम क्र.चैतन्य श्रीकांत दळवी द्वितीय क्र. खुशी विठ्ठल आमडोसकर
तृतीय क्र.गंधर्व विठ्ठल नारकर (सर्व आयडियल इंग्लिश स्कूल, वरवडे)

इयत्ता आठवी-सेमी इंग्रजी:-
प्रथम क्र. सानवी रघुनाथ कारेकर (विद्यामंदिर हायस्कूल)
द्वितीय क्र.पूर्वा संतोष सावंत (एस एम हायस्कूल)
तृतीय क्र.भार्गव भरत काणेकर (एस एम हायस्कूल)

या कार्यक्रमात वेदिक गणित सर्टिफिकेट कोर्स व ज्युनिअर न्यूटन टॅलेंट सर्च परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच गुरुकुलचे सायन्स विभागाचे प्रमुख मुकुंद चिकोडी यांना यंदाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच फाउंडेशनचे मुख्य उद्दिष्ट असून मुलांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन देत पुढील वाटचाल यशस्वी करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील असू ,अशी ग्वाही डी. के. फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. दत्ता केसरकर यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुकुलच्या प्राचार्य विद्या घाणेकर मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन रूपाली कदम मॅडम व विशाल कासले सर यांनी केले. आभार मुकुंद चिकोडी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ऐश्वर्या निमणकर, जयदीप मोहिते, ऋषिकेश खटावकर, अक्षय हेदुळकर ,आदित्य केसरकर यांनी मेहनत घेतली.

error: Content is protected !!