केईएम हॉस्पिटल मधील रुग्ण व नातेवाईकांची राहण्याची व्यवस्था व्हावी या मागणीचे उपाेषण स्थगित – प्रमाेद जठार

केईएम परिसर हेल्थ कॉरिडॉर जाहीर करण्याची माजी आमदार प्रमोद जठार यांची मागणी

न्यूज ब्युराे (मुंबई) : डीन डॉ. संगीतl रावत व भाजपा माजी आमदार प्रमाेद जठार यांच्यात केईएम हॉस्पिटल मध्ये झालेल्या मीटिंग मधील चर्चl व विनंतीवरून व भोईवाडा पोलीस ठाणे यांचे पोलीस निरीक्षक श्री बोराडे यांच्या उद्या मुंबईत येणाऱ्या मराठा मोर्च्याच्या मुळे पोलिसांवरील ताण कमी व्हावा या विनंती मुळे २६ जानेवारी २०२४ चे मुंबई केईएम हॉस्पिटल येथील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकlना राहण्या साठी व्यवस्था करावी यासाठी करण्यात येणारे लाक्षणिक उपोषण स्थगित करण्यात येत असल्याचे भाजपा माजी आमदार प्रमाेद जठार यांनी सांगितले.तसेच पुढील बैठक लवकरच मुंबई आयुक्तांसोबत घेण्यात येईल असेही ते म्हणाले.

error: Content is protected !!