कर्लाचाव्हळ येथील वळणावर कारचा अपघात ; सुदैवाने कारचालक किरकोळ जखमी

चौके (प्रतिनिधी) : मालवण वरून कुडाळच्या दिशेने जाणार्‍या मारुती ईर्टीका या कारचा कर्लाचाव्हळ शाळेनजिकच्या वळणावर शुक्रवारी दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान अपघात घडला. यामध्ये कार रस्त्याच्या बाजुला पलटी झाली. कारचालक व त्याचा सहकारी किरकोळ जखमी झाले. ग्रामस्थ तसेच मार्गावरील वाहनचालकानी कारमधील चालक तसेच अन्य सहकारी यांना कारच्या काचा फोडून बाहेर काढत दोन्ही जखमीना अधिक उपचारासाठी चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले जखमीवरती वैद्यकिय अधिकारी डाॅ. प्रणव पोळ यानी उपचार करून घरी पाठविले. चालकाचा कारवरील ताबा सुटून रस्यापासून काही अंतरावर जात पलटी झाली, अपघातात कारचे मोठे नुकसान झाले होते.

error: Content is protected !!