आई चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे १९ ते २१ फेब्रुवारी कालावधीत शिवजयंती निमित्त सांस्कृतिक महोत्सव

विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण ; केंद्रीय मंत्री नारायण राणेंची पत्रकार परिषदेत माहिती

ओराेस (प्रतिनिधी) : आपल्या एम एस ई बी, भारतीय जनता पक्ष आणि आई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने १९ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत शिवजयंती निमित्त सांस्कृतिक महोत्सव, यानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी मंत्री नारायण राणे यांनी दिली.

पडवे येथील लाईफ टाईम मेडिकल कॉलेज येथील आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री राणे बोलत होते. यावेळी डॉ मिलिंद कुलकर्णी, एम एस ई बी विभागाचे अधिकारी श्री बदाने, बाजीराव साने, अनिल गवळी आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील तरुणांना उत्तेजन द्यावे. त्यांच्या कलेला वाव द्यावा. विचाराला चालना द्यावी, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती यावेळी मंत्री राणे यांनी दिली. शिवजयंती निमित्त जिल्ह्यात वक्तृत्व, चित्रकला आणि निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. त्याला मोठा प्रतिसाद लाभला. वक्तृत्व स्पर्धेत ४५०, चित्रकला स्पर्धेत १७०० तर निबंध स्पर्धेत ७५० एवढ्या स्पर्धकांनी भाग घेतला आहे. पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि अकरावी ते पंधरावी अशा तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली असून त्याची जिल्हास्तरीय स्पर्धा कुडाळ येथे घेण्यात येणार असून या कार्यक्रमानिमित्त १९ रोजी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!