एलसीबी पोलिस निरीक्षकपदी अतुल जाधव यांची नियुक्ती

सिंधुदुर्ग ( राजन चव्हाण ) : सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण च्या रिक्त पोलीस निरीक्षकपदी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ले पोलीस निरीक्षक पदावरून आंतरजिल्हा बदली झाल्यानंतरही पीआय अतुल जाधव यांच्या उत्कृष्ट कामगीरी आणि प्रशासकीय कामाच्या गाढा अनुभव लक्षात घेत त्यांची जिल्ह्याबाहेर बदली न करता सिंधुदुर्ग एलसीबी च्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग पोलीस दलात पोलीस निरीक्षकपदी कार्यरत असताना पीआय अतुल जाधव यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखतानाच अभिनव पद्धतीने सायबर क्राईम, ड्रग्ज  विरोधी अभियान राबवले होते. ज्याची दखल अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक यांच्यासह कोकण परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक यांनीही घेतली होती. खून , बलात्कार, सारखे गुन्हे उजेडात आणतानाच पिटा सारखी दोन वेळा कारवाईही त्यांनी केली होती.खाकी वर्दीला लोकप्रियता मिळवून देत कर्मचारीप्रिय अधिकारी असा लौकिक त्यांनी कमावला आहे.

error: Content is protected !!