तिसरीतील विद्यार्थिनीला शिक्षक किशोर गोसावींकडून लाकडी छडीने वळ उठेपर्यंत मारहाण

पीडित मुलीच्या पालकांची पोलीस ठाण्यात फिर्याद ; शिक्षणमंत्र्यांनी गंभीर दखल घेण्याची मागणी

शिक्षक गोसावी विरुद्ध गुन्हा दाखल

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील एका प्राथमिक शाळेत तिसरीतील विद्यार्थिनीला शाळेचे मुख्याध्यापक किशोर गोसावी यांनी लाकडी छडीने मारहाण केल्याची घटना घडली असून त्या विद्यार्थिनीच्या पालकांनी थेट कणकवली पोलीस ठाण्यात शिक्षक किशोर बाळकृष्ण गोसावी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. शिक्षणमंत्री केसरकर यांच्या जिल्ह्यातच शालेय विद्यार्थिनीला शिक्षकाकडून झालेल्या मारहाणीच्या घटनेची गंभीर दखल शिक्षणमंत्र्यांनी घेण्याची अपेक्षा पीडित विद्यार्थिनीच्या पालकांकडून व्यक्त होत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की 31 जानेवारी रोजी शालेय वेळेत कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीला शिक्षक गोसावी यांनी अभ्यासाबाबत काही प्रश्न विचारले. त्याचे उत्तर न दिल्याच्या रागातून गोसावी यांनी लाकडी काठी ने पीडित विद्यार्थिनीला पायावर आणि पाठीवर वळ उठेपर्यंत मारहाण केली. पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिक्षक गोसावी विरोधात आयपीसी 324 आणि अल्पवयीन न्याय मुलांची काळजी व संरक्षण कायदा 2015 चे कलम 75, 82 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!