जिल्हाध्यक्ष अमित सामंतांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर दबाव आणत सुरू असलेल्या चौकशीचा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने निषेध केला असून जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी किशोर तावडे याना निवेदन दिले. बरखास्त संचालक मंडळापैकी सत्तेत असलेले अजित पवार आणि अन्य संचालकांना वगळून सत्तेचा गैरवापर करून रोहित पवार यांना नाहक त्रास दिला जात असल्याचा निषेध यावेळी करण्यात आला. निवेदनात म्हटले आहे की, आज आमदार रोहित पवार यांची चौकशी ज्या राज्य सहकारी बँकेच्या प्रकारणावरून केली जात आहे त्या राज्य सहकारी बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळांची यादी पाहीली तर त्यापैकी अनेकजण आज भाजपमध्ये किंवा अजित पवार गटामध्ये किंवा शिंदे गटामध्ये आहेत. त्यात स्वतः अजित पवार यांच्यासह अमरसिंह पंडीत, सुनील कुंदे, नितीन पाटील, माणिकराव कोकाटे, रामप्रसाद बोडर्डीकर, शेखर निकम, विजयसिंह मोहिते पाटील, राजन तेली, दिलीपराव सोपल, आनंदराव अडसूळ, धनंजय दलाल यांचा समावेश आहे. शिवाय या बरखास्त संचालक मंडळाविरोधात गुन्हा दाखल असून यामध्ये रोहित पवार यांचा काहीही संबंध नाही. परंतु या सर्वांभोवती सत्तेचे कवच असल्याने त्यांचौ कोणतीही चौकशी केली जात नाही परंतु आमदार रोहित पवार यांचा कोणताही संबंध नसताना त्यांची मात्र चौकशी केली जात असून ‘चोर सोडून सन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार आहे. तसेच नाबार्डचा अहवाल आणि उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेनुसार दाखल झालेला गुन्हा हा २०१० चा असून आमदार रोहित पवार यांच्या बारामती ऍग्रो कंपनीने कन्नड येथील साखर कारखाना हा २०१२ साली लिलावामध्ये ५०.२० कोटी इतकी सर्वाधिक बोली लावून खरेदी केलेला आहे. त्यामुळे राज्य बँकेकडून बेकायदेशीर कर्जवाटप प्रकरणात आमदार रोहित पवार यांचा दुरान्वयेही संबंध नाही. शिवाय २०१९ मध्ये ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्हयाच्या तपासात कोणताही बेकायदेशीर व्यवहार झाला नसल्याचे स्पष्ट झाले, त्यामुळे हा तपासही बंद करण्यात आला आहे. परंतु केवळ त्रास देण्याच्या हेतूनेच या सरकारकडून आमदार रोहित पवार यांची चौकशी करत असून लोकांचे प्रश्न विचारणाऱ्याला जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याचे या आंदोलकांचे म्हणणे आहे. याविरोधातच हे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून त्यांनी आक्रमकपणे सरकारविरोधात घोषणाबाजी निषेध केला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते व सामान्य नागरीक सहभागी झाले होते.
“राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही नेहमीच सामान्य लोकांच्या प्रश्नांवर आवाज उठवला आहे. आमदार रोहितदादा पवार हेही आदरणीय शरद पवार साहेबांसोबत महाराष्ट्र धर्माच्या विचारांसाठी लढत आहेत आणि म्हणूनच त्यांच्यावर आकसाने कारवाई केली जात असून ती अन्यायकारक आहे. या कारवाईचा आम्ही तीव्र निषेध करतो. सरकारने कितीही त्रास दिला तरी आम्ही त्यांना शरण जाणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत घाबरून भाजपसोबत पळूनही जाणार नाही तर कठोर संघर्ष करू, लढू आणि जिंकू. असे म्हटले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे भास्कर परब, शिवाजीराव घोगळे,
कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर ,रुपेश जाधव, सचिन पाटकर, सचिदानंद के नयाङकर,समीर आचरेकर, दिवाकर मूरकर ,नयन गावडे ,शंकर चिंदरकर, चंद्रकान्त नाईक, बबलू गावडे,विनायक गावडे, अक्षय मराठे,प्रसाद गावडे गौरव गावडे,देवेन्द्र पिळणकर, अविनाश चव्हाण, सागर वारंग, मारुती पवार ,नजिर शेख, सचिन पेडणेकर, महेश चव्हाण, अप्पा तेली सुजय शेलार, जरीफ शेख आदी उपस्थित होते.