हवालदार रमेश नारनवर यांची सातारा जिल्ह्यात बदली

वैभववाडी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग पोलिस दलातील वैभववाडी पोलीस ठाण्यातील हवालदार रमेश नारनवर यांची सातारा जिल्ह्यात विनंती बदली करण्यात आली आहे. रमेश नारनवर हे 2008 साली सिंधुदुर्ग पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबलपदी भरती झाले होते.16 वर्षांच्या पोलिस दलाच्या सेवेत नारनवर यांनी अत्यंत कर्तव्यदक्षतेने काम केले.अडीच वर्षे जिल्हा मुख्यालयात सेवा केल्यानंतर त्यांनी 6 वर्षे बांदा पोलीस ठाण्यात सेवा केली. कणकवली पोलीस ठाण्यातही 5 वर्षे सेवा करताना फोंडाघाट व कासार्डे पोलीस दुरक्षेत्र येथे काम केले. वैभववाडी पोलीस ठाण्यात सेवा करताना वाहतूक चार्जही त्यांनी सुरळीत सांभाळला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 16 वर्षांच्या सेवाकाळात रमेश नारनवर यांनी कर्तव्यदक्ष कर्मचारी म्हणून काम करताना लोकप्रिय पोलीस कर्मचारी म्हणूनही प्रतिमा निर्माण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!