दि. 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2024 वेळ: स. 9 ते सायं. 7 वा.
कणकवली (प्रतिनिधी) : विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर च्या वतीने मोफत मोतीबिंदू तपासणी शिबीर 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2024 दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान आयोजित केले आहे. मोतीबिंदूचे निदान पुढील पद्धतीने केले जाते : डोळयात औषध टाकून डोळ्यातील बाहुली मोठी केली जाते. स्लीट लॅम्पच्या माध्यमातून केलेल्या तपासणीतून मोतीबिंदू चे अचूक निदान होते. मोतीबिंदूची तिव्रता ही त्यातून लक्षात येते.मोतीबिंदू शस्त्रक्रिया पुढीलल दोन प्रकारांमध्ये केली जाते.विनाटाका शस्त्रक्रिया मध्ये लहान छेद घेऊन ऑपरेशन करतात. विनाटाका ऑपरेशन मध्ये साधारण १ महिना काळजी घ्यावी लागते.ऑपरेशन नंतर जवळचा लांबचा दोन्ही चष्म्याचा नंबर लागतो.
यासाठी खास ऑफर देण्यात आली असून 6000 ची शस्त्रक्रिया फक्त 3,999 रु. मध्ये करण्यात येणार आहे. Phaco (फेको) ऑपरेशन मध्ये जखम कमी प्रमाणात असते, दोन दिवसात जखम भरते, ८ दिवसात दैनंदिन काम करु शकतो.घडीची लेन्स (foldable) मशिनद्वारे शस्त्रक्रिया विना इंजेक्शन विना टाका 11000 ची शत्रक्रिया फक्त 7,999 रु. मध्ये केली जाणार आहे. तसेच 15, 000 ते 1,00,000 पर्यंतच्या लेन्स वर 10% सूट देण्यात येणार आहे. यासाठी नाव नोंदणी आवश्यक असून नावनोंदणी साठी विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर कणकवली ( रविवार बंद ) ,प्रहार ऑफिसच्या शेजारी मोबा-9850849315 / 8408803536 / 02367-233933 कुडाळ ओपीडी पोस्ट ऑफिस जवळ, माधवबाग शेजारी आठवड्यातून बुधवार व शुक्रवार वेळ- स.१०.०० ते सायं. ५.००मोबा-9850849315/8408803536 वर संपर्क साधावा.













