कणकवलीतील माहेरी आलेली विवाहिता बेपत्ता

कणकवली (प्रतिनिधी) : काजल प्रवीण कांबळे (वय 30,रा. राणे चाळ पटकीदेवी मंदिर,कणकवली ) ही विवाहिता आज 1 फेब्रुवारी रोजी सकाळी घरात कोणालाही न सांगता निघून गेली. काजल ही मागील काही महिने माहेरी वडिलांकडे राहत असून आज सकाळपासून बेपत्ता झाल्याची खबर अमर वसंत जैताळकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. काजल हि साडेपाच फूट उंच असून मोरपंखी रंगाचा टॉप व निळसर रंगाचा पायजमा घातलेला आहे.गळ्यात सोन्याचे मंगळसूत्र,कानात कर्णफुले आहेत.

error: Content is protected !!