चौके (प्रतिनिधी) : कट्टा- वराड येथील सहकार महर्षी प्रा. कै. डी. बी. ढोलम यांच्या पत्नी श्रीमती रतन (माई) धोंडी ढोलम ( ८८ ) यांचे वराड कावळेवाडी येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. तिच्या पश्चात चार मुलगे, तीन मुली, सूना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. प्रा. डी. बी. ढोलम यांच्या सहकारातील यशामध्ये तिचा मोलाचा वाटा होता. राजकीय कारकीर्द असो सामाजिक अथवा शैक्षणिक असो ती नेहमी सरांच्या पाठीशी उभी असायची. वाडीत कुणावर सुखद प्रसंग असो अथवा दुःखद प्रसंग असो प्रत्येक प्रसंगी ती नेहमी प्रत्येकाच्या मदतीला धाऊन जात असे. अनेकांची ती माई म्हणून गावात परिचित होती. बऱ्याच गोरगरिबांच्या पोटात तिचे अन्न रुपी हात पोहोचले होते.
वराड कावळेवाडी येथील प्रसिद्ध सॉ मिलचे मालक प्रदीप ढोलम, बाबा ढोलम, उद्योजक देवेन ढोलम, सामाजिक कार्यकर्ते छोटू ढोलम यांच्या त्या मातोश्री होत. येथील स्मशानभूमीत तिच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, बँकिंग, सहकार क्षेत्रातील मंडळी उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.