8 फेब्रुवारीला पनवेल हून अयोध्येला निघणार स्पेशल ट्रेन
भाजपा लोकसभा प्रमुख जठार यांची माहिती
कणकवली (प्रतिनिधी) : 8 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता पनवेल रेल्वे स्टेशनवरून सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातील रामभक्तांना घेऊन अयोध्येला रवाना होणार आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील 250 रामभक्त कार्यकर्ते असे दीड हजार रामभक्त प्रभुश्रीरामांचे दर्शन घ्यायला रवाना होतील. 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता रामलल्ला च्या नवीन मंदिरात महाआरती करतील. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या स्पेशल ट्रेन चा शुभारंभ भगवा झेंडा दाखवून करणार आहेत अशी माहिती भाजपाचे माजी आमदार तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रमुख प्रमोद जठार यांनी दिली. ही स्पेशल अयोध्या एक्सप्रेस ट्रेन प्रमोद जठार यांच्या नेतृत्वाखाली निघणार असून विधानसभा मतदारसंघनिहाय उल्काताई विश्वासराव, बाळ माने, प्रमोद आदट राव, निलेश राणे, नितेश राणे, राजन तेली याचे संयोजन करणार आहेत.
यावेळी माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, डामरे माजी सरपंच बबलू सावंत उपस्थित होते.












