केईएम हेल्थ कॉरिडॉरसाठी मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांचाही पुढाकार

कणकवली (प्रतिनिधी) : कॅन्सर उपचारासाठी प्रसिद्ध असलेले टाटा हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल चा परिसर हेल्थ कॉरिडॉर करण्यासाठी मुंबईचे पालकमंत्री सिंधुदुर्ग चे सुपुत्र नामदार दीपक केसरकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून याबाबत अधिकृत बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे भाजपा माजी आमदार प्रमोद जठार यांनी सांगितले.या सर्व हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होणाऱ्या रुग्णांचे नातेवाईक फुटपाथ वर झोपतात.केईएम च्या डीन संगीता रावत यांच्याशी झालेल्या तात्काळ बैठकीत केईएम हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटल, टाटा कॅन्सर हॉस्पिटल, हाफकीन चा परिसर हेल्थ कॉरिडॉर घोषित करण्याची मागणी मी केली आहे.या परिसरातील जीर्ण इमारती डेव्हलप करताना जादा एफएसआय देऊन ती मिळणारी जागा रुग्णांच्या नातेवाईकांसाठी वापरावी. यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागेल. जर हेल्थ कॉरिडॉर जाहीर झाला तर आवश्यक तो निधी केंद्र सरकार, राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका यांच्या माध्यमातून उभारता येईल.

error: Content is protected !!