वायंगणी हायस्कुल येथे संकल्प दिवस साजरा…!

काका साहेब आसोलकर यांच्या 22 व्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य…

आचरा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील ज्ञानदीप संस्था संचलित ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय वायंगणी येथे सामाजिक कार्यकर्ते कै. काका साहेब आसोलकर यांचा 22 वा स्मृतिदिन संकल्प दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सुरेश चौकेकर सर व हनुमंत प्रभू यांच्या हस्ते काका साहेब आसोलकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी मान्यवारांनी व शाळेतील विद्यार्थी, शिक्षक यांनी काका साहेबांनच्या आठवणीना उजाळा दिला. यावेळी संस्थेच्या वतीने शाळेचे क्रिडांगण सुशोभित व सुसज्ज करण्याचा संकल्प संस्था सदस्य हनुमंत प्रभू यांनी जाहीर केला.

यावेळी वायंगणी उपसरपंच तसेच ज्ञानदीप संस्थेच्या कोषाध्यक्ष ॲड समृद्धी आसोलकर, संस्था सदस्य मनोहर वायंगणकर, मुख्याध्यापक टकले तसेच ज्ञानदीप मध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!