शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांचे टीकास्त्र
कुडाळ (कुडाळ) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक, उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख श्री.संजय पडते यांच्या आजच्या पत्रकार परिषदेचा शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी घेतला खरपूस समाचार घेतला आहे.
महविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री .उद्धव ठाकरे जेव्हा भेट देत नव्हते.तेव्हा श्री.वैभव नाईक हे एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघासाठी निधी आणत होते,त्यामुळे वैभव नाईक यांना कोणीतरी लिहून देणार आणि आपण थेट मिडीयासमोर मांडण्यापूर्वी वाचून मनाला पटते का त्याची खात्री करावी. वैभव नाईक यांचे डावे उजवे रुपेश पावसकर यांच्या संपर्कात…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार .वैभव नाईक, उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख श्री.संजय पडते यांनी आज आपल्या पत्रकार परिषदेत बोलताना जिल्ह्यात शिंदे गटाचे अस्तित्व नाही असे वक्तव्य केले.वैभव नाईक हे वैफल्यग्रस्त झाले आहेत.तसेच ते आपल्या पक्षातील कार्यकर्त्याना सांभाळू शकत नाहीत,त्यामुळे ते असे बेताल वक्तव्य करत आहेत. आमच्या शिंदे शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर असंख्य कार्यकर्ते प्रवेश करत आहेत.हे सर्व उबाठाचे कार्यकर्ते आहेत,त्यामुळे वैभव नाईक यांनी आपले आत्मपरीक्षण करावे.तसेच पक्षातील गळती ते थांबवू शकले नाहीत हे त्यांचे अपयश आहे,त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आमचा उमेदवार हा ३ लाख एवढे मताधिक्य घेऊन निवडून येईल. त्याचप्रमाणे आमचे दीपक भाई हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्ध आहेत,त्यांनी जिल्ह्याचा आराखडा १९० कोटी एवढा भरीव केला.जिल्ह्यात काथ्या उद्योग सारखे प्रकल्प हे दीपक भाईनी आणले,दीपक भाईना बोलण्याचा नैतिक अधिकार वैभव नाईक यांना नाही,शिंदे गटाचा भव्य मेळावा हा सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याच्या मध्यभागी म्हणजेच राजापूर येथे राजीव गांधी मैदान येथे झाला,यावेळी बोलताना संजय पडते हे देखील बोलले की,खासदार विनायक राऊत हे वैयक्तिक मदत करतात,त्यांनी किती लोकांना मदत वैयक्तिक मदत केली ते जाहीर करावे.जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना शिंदे साहेबांचे नेतृत्व मान्य असल्याने शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणावर उबाठा चे कार्यकर्ते प्रवेश करत आहेत.











