खारेपाटण (प्रतिनिधी) : खारेपाटण बंदरवाडी येथील श्री गणेश मंदिर येथे माघी गणेश जयंती निमित्त १३ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता भव्य खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन गणेश मंडळ बंदरवाडी खारेपाटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेकरिता प्रथम क्रमांकाचे बक्षीस रोख ७००० /- रुपये व सन्मानचिन्ह व द्वितीय क्रमांक रोख ५००० /- रुपये व सन्मानचिन्ह तर तृतीय क्रमांक रोख ३००० /- रुपये व सन्मानचिन्ह ठेवण्यात आले आहे. तसेच या स्पर्धेकरीता प्रवेश फी फक्त १००/- रुपये ठेवण्यात आली आहे.
तसेच ही स्पर्धा एकेरी नृत्य प्रकारातील असून फक्त एकावेळी एकच स्पर्धक नृत्यात सहभाग घेऊ शकतो.नृत्य सादरीकरणासाठी फक्त ५ ते ७ मिनिटे एवढा वेळ देण्यात येणार आहे.स्पर्धकांनी आपली नृत्य ध्वनी फीत स्वतः पेन ड्राईव्ह किंवा मोबाईल मध्ये घेऊन यायची आहे. तसेच ज्या स्पर्धकांना या स्पर्धेत सहभाग घ्यावयाचा आहे.त्यांनी आपली नावे मंडळाचे कार्यकर्ते गिरीश पाटणकर – ९७६४७८०३०३ योगेश गोडवे – ९०२१४३५०५० यांचेकडे नोंदवावित असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.












