वैभववाडीत शिवजन्मोत्सव २०२३ निमित्त आयोजित चित्रकला स्पर्धा संपन्न

तालुक्यातील ७० विद्यार्थ्यांचा चित्रकला स्पर्धेत सहभाग

वैभववाडी (प्रतिनिधी) : आई सेवा चॅरिटेबल ट्रस्ट पडवे सिंधुदुर्ग यांच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात शिवजयंती निमित्त भव्य निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा संपन्न होत आहेत. आज वैभववाडी येथे अर्जुन रावराणे विद्यालयात तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी तालुक्यातील जवळपास ७० विद्यार्थी सहभागी झाले होते.या प्रसंगी कणकवलीचे माजी सभापती मनोज रावराणे, जेष्ठ शिक्षक एस.बी. शिंदे, माजी जि.प.सदस्य सुधीर नकाशे, एस.एम.तुळसकर , पी.बी.पवार, एस.टी.तुळसणकर , कलाशिक्षक एम.एस.चोरगे उपस्थित होते.

error: Content is protected !!