कणकवली तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत प्रा.योगेश चव्हाण प्रथम

कणकवली पत्रकार संघाच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते योगेश चव्हाण यांना केले सन्मानित

वैभववाडी (प्रतिनिधी) : कणकवली तालुका पत्रकार संघातर्फे कणकवली तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘भारताची महासत्तेकडे वाटचाल ‘ हा विषयावर खुल्या गटासाठी देण्यात आला होता. या स्पर्धेत कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक योगेश गंगाराम चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज रविवार ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पिसेकामते येथील मैत्री रिसॉर्ट गार्डन येथे संपन्न झाला. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते योगेश चव्हाण यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर, सा.बां.चे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, तहसिलदार दीक्षांत देशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, माजी जिल्हाध्यक्ष गणेश जेठे, कणकवली तालुकाध्यक्ष अजित सावंत, उपाध्यक्ष माणिक सावंत, खजिनदार योगेश गोडवे आदी मान्यवर मान्यवर उपस्थित होते .

error: Content is protected !!