कणकवलीतील शिवभक्ताची गॅरेज मध्ये शिवजयंती

कणकवली (प्रतिनिधी) : शिवजयंती म्हटलं की शिवभक्तांच्या उत्साहाला उधन्हे ठरलेलेच….गावोगावी विविध मंडळांमार्फत शिवजयंती चे आयोजन हे ओघाने आलेच. मात्र कणकवलीत पेशाने मॅकनिकल व योगशिक्षक असलेल्या प्रथमेश परब या शिवभक्त तरुणाने आपल्या दुचाकी मोटार गॅरेज मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पूजन करत सर्वांना मीठाई वाटपही केले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रथमेश सावंत, उद्योजक संदीप ठाकूर , युवासेना कलमठ विभागप्रमुख रिमेश चव्हाण, राजू राणे उपस्थित होते.

error: Content is protected !!