शिवसेना संपर्क कार्यालयात शिवजयंती साजरी

जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण

कणकवली(प्रतिनिधी) : निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या दिलेल्या निकालानंतर आज कणकवली शिवसेना संपर्क कार्यालयात शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. घोषणा देत छत्रपतींचा जयजयकार करण्यात आला. यावेळी उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत, उपजिल्हाप्रमुख शेखर राणेतालुकाप्रमुख भूषण परुळेकर, तालुका समन्वयक सुनील पारकर, जेष्ठ शिवसैनिक भास्कर राणे, माजी सभापती संदेश पटेल, सोशल मीडिया जिल्हाप्रमुख महेश तेली, सुनील हरमलकर, निलेश तेली, बाबू आचरेकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!