शिवसेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख पदी महेश तेली यांची नियुक्ती

कणकवली (प्रतिनिधी) : शिवसेना सिंधुदुर्ग सोशल मीडिया जिल्हाप्रमुखपदी श्री महेश तेली यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाप्रमुख संजय आग्रे, उपजिल्हाप्रमुख महिंद्र सावंत यांच्या हस्ते तेली यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी जेष्ठ शिवसैनिक भास्कर राणे, कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, माजी सभापती संदेश पटेल, निलेश तेली, बाबू आचरेकर, सुनील हरमलकर तसेच अनेक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्यातील व शहरातील सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर करण्यात येणार असल्याचे नूतन सोशल मीडिया जिल्हाप्रमुख महेश तेली म्हणाले.

error: Content is protected !!