वागदे ग्रामपंचायत मध्ये शिवजयंती साजरी

सरपंच संदीप सावंत यांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण

कणकवली(प्रतिनिधी) : वागदे ग्रामपंचायत मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यानंतर जय जिजाऊ जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देत छत्रपतींचा जयजयकार करण्यात आला. जिल्हा परिषद शाळा वागदे नं 1 च्या विद्यार्थ्यांनी छत्रपती आणि जिजाऊ तसेच मावळ्यांची केलेली वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. उपस्थितांना जिलेबी वाटप करण्यात आले. यावेळी उपसरपंच शामल गावडे, ग्रामसेवक युवराज बोराडे, सर्व ग्रा.पं सदस्य, गावठाणवाडी युवक मंडळ वागदे चे युवक कार्यकर्ते, शिक्षकवृंद, तसेच वागदे ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!