फोंडाघाट-नवीन कुर्ली येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

नवदुर्गा युवा मंडळाकडुन आयोजन

कणकवली(प्रतिनिधी): महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज नवदुर्गा युवा मंडळाकडून मोठया उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी ९:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले आणि  शिवगर्जना करून 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' , 'जय भवानी जय शिवाजी' अशा घोषणांची परिसर दुमदुमून सोडला या प्रसंगी नवदुर्गा युवा मंडळाचे अध्यक्ष प्रशांत दळवी, मंगेश मडवी,अमित दळवी,विजय आग्रे,सचिन परब, सुहास साळसकर, अतुल डऊर, राजेश हुंबे,अनिल दळवी, शिवाजी चव्हाण, परेश पोवार,प्रसाद कोलते तसेच नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते, उपाध्यक्ष सुरज तावडे, प्रिया दळवी, योगिता मडवी ,शिवराम पोवार, अशोक पिळणकर,प्रकाश दळवी,मधुकर परब,चंद्रकांत मर्गज,शांताराम पार्टे, प्रकाश आग्रे,वसंत  येंडे,मधुकर शिंदे, प्रसाद नांदगावकर इतर ग्रामस्थ आणि शिवभक्त उपस्थित होते.
       शिवजयंती निमित्त मंडळाकडून दिवस भर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये सायं. ५:०० वा. महिलांसाठी हळदी कुंकू, सायं. ६:०० वा मुलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि रात्री स्थानिक भजनांचे आयोजन केले आहे.
error: Content is protected !!