कणकवली(प्रतिनिधी): तालुक्यातील नांदगाव गणेश सेवा मंडळ च्या वतीने वाजत गाजत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिश्वर स्मारकाची प्रतिष्ठापना करण्यात आली.नांदगाव तिठा ते नांदगाव वाघाची वाडी येथील गीता भवन सभागृह पर्यंत ढोल ताशांच्या गजरात व शिवरायांच्या जयघोषाने मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत बहुसंख्येने मावळे सामिल झाले होते.शिवजयंतीनिमित्त नांदगाव वाघाचीवाडी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे तरी सर्वांनी तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रम पुढीलप्रमाणे
संध्या. ५.०० वा. श्री सत्यनारायणाची पूजा
रात्रौ ०८.०० वा. महाप्रसाद
रात्रौ ०९.३० वा. स्थानिक भजन
रात्रौ १०.०० वा. दशावतार नाटक “बम्हाक्ष उद्धार” तरी कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन गणेश सेवा मंडळ वाघाची वाडी नांदगाव च्या वतीने करण्यात आले आहे.












